सर्वसामान्यांसाठी घरांची निर्मिती करणाऱ्या ‘म्हाडा’ची २०१४ घरांची सोडत जाहीर झाली असून मुंबईतील ८१४ तर विरार आणि वेंगुर्ला येथील एकूण १८२७ अशा २६४१ घरांचा त्यात समावेश आहे.
मुंबईतील ८१४ घरांमध्ये उच्च उत्पन्न गटातील २४५ घरांचा, मध्यम उत्पन्न गटातील ६५ घरांचा, विनोबा भावे नगर कुर्ला येथील २०७ घरांचा तर अत्यल्प उत्पन्न गटातील २९७ घरांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत १६ लाख २६ हजार ५०० पासून सुरू होते, तर दहिसर येथील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत तब्बल ८० लाख ९८ हजार ५०० रुपये आहे.
कोकण मंडळातर्फे विरार येथील १७१६ घरांची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वेंगुर्ला येथील १११ घरांची जाहिरात काढण्यात आली आहे. विरार येथे १११६ घरे अल्प उत्पन्न गटातील आहेत, तर ६०० घरे मध्यम उत्पन्न गटातील आहेत. वेंगुल्र्यात ४० घरे अल्प उत्पन्न गटातील, ५९ घरे मध्यम उत्पन्न गटातील तर १२ घरे उच्च उत्पन्न गटातील आहेत. कोकण मंडळातर्फे काढण्यात आलेल्या घरांची किंमत ११ लाख ८५ हजारांपासून ते ५० लाख २१ हजार ६१४ रुपयांपर्यंत आहे.
या घरांचा आकार, त्यासाठीचे आरक्षण, किंमत व अनामत रकमेचा तपशील ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. १५ एप्रिल २०१४ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. सोडतीचा दिवस अद्याप जाहीर झालेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2014 रोजी प्रकाशित
‘म्हाडा’च्या २६४१ घरांची सोडत
सर्वसामान्यांसाठी घरांची निर्मिती करणाऱ्या ‘म्हाडा’ची २०१४ घरांची सोडत जाहीर झाली असून मुंबईतील ८१४ तर विरार आणि वेंगुर्ला येथील एकूण १८२७ अशा २६४१ घरांचा त्यात समावेश आहे.

First published on: 02-03-2014 at 04:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhadas 2641 houses lottery draw