मुंबई : निर्भीड पत्रकारितेने समाजाच्या विकासात योगदान देणारे ‘इंडियन एक्स्प्रेस समूहा’चे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या १२०व्या जयंतीनिमित्त गिरगावमधील किलाचंद उद्यानातील स्फूर्तीस्थळी जाऊन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आदरांजली वाहिली. निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून रामनाथ गोएंका यांनी भारतीय राजकारणावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. आणीबाणीच्या काळात रामनाथ गोएंका यांनी निर्भिडपणे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या माध्यमातून जनतेचा आवाज बनून काम केले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘हिरोज ऑफ मुंबई’ उपक्रमाच्या माध्यमातून  किलाचंद उद्यान येथे उभारण्यात आलेल्या स्फूर्तीस्थळी रामनाथ गोएंका यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister mangal prabhat lodha pay homage to ramnath goenka on occasion of 120th birth anniversary zws
First published on: 19-04-2024 at 03:17 IST