मुंबई : महायुती सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कामगिरीवर आधारित प्रगतिपुस्तकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडील एकाही खात्याचा पहिल्या पाच क्रमांकामध्ये समावेश नाही. फडणवीस यांच्याकडील गृहखात्याची ३७ टक्केच फलनिष्पती झाली आहे. शिंदे यांच्याकडील दोन्ही नगरविकास खात्यांमधील उद्दिष्टांची अनुक्रमे ३४ व १० टक्केच पूर्तता झाली आहे.
याशिवाय ऊर्जा खाते ४० टक्के, सामान्य प्रशासन विभागातील ८ टक्केच लक्ष्य गाठले गेले आहे. शिंदे यांच्या गृहनिर्माण विभागाची ४५ टक्के पूर्तता झाली आहे. अजित पवारांकडील उत्पादन शुल्क विभागाची पाच टक्केच पूर्तता झाली आहे. काही विभागांनी उद्देशाची पूर्तता करण्यासाठी जास्त वेळ मागून घेतला आहे.
फेब्रुवारी महिन्यात या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. यामध्ये सर्व महापालिकांमध्ये ठाणे महापालिका प्रथम क्रमांकावर असल्याचे समोर आले होते.
● सर्वोत्तम विभाग
१) महिला व बालविकास (८० टक्के गुण) २) सार्वजनिक बांधकाम (७७.९५ टक्के) ३) कृषि (६६.१५ टक्के) ४) ग्रामविकास (६३.८५ टक्के) ५) परिवहन व बंदरे (६१.२८ टक्के)
● सर्वोत्तम जिल्हाधिकारी
१) चंद्रपूर – ८४.२९ टक्के २) कोल्हापूर – ८१.१४ ३) जळगाव – ८०.८६ ४) अकोला – ७८.८६ टक्के ५) नांदेड – ६६.८६ टक्के
● सर्वोत्तम महापालिका आयुक्त
१) उल्हासनगर – ८६.२९ टक्के २) पिंपरी-चिंचवड – ८५.७१ टक्के ३) पनवेल – ७९.४३ टक्के ३) नवी मुंबई – ७९.४३ टक्के
● सर्वोत्तम पोलीस आयुक्त
१) मीरा भाईंदर – ८४.५७ टक्के २) ठाणे – ७६.५७ टक्के ३) मुंबई रेल्वे आयुक्त – ७३.१४ टक्के
● सर्वोत्तम विभागीय आयुक्त
१) कोकण – ७५.४३ २) नाशिक – ६२.२९ टक्के २) नागपूर – ६२.२९
● सर्वोत्तम जिल्हा परिषदा
१) ठाणे – ९२ टक्के २) नागपूर – ७९.४३ टक्के ३) नाशिक – ७५.४३ टक्के ३) पुणे – ७५.४३ टक्के ४) वाशिम – ७२ टक्के
● सर्वोत्तम आयुक्त व संचालक
१) तंत्र शिक्षण – ७७.४३ टक्के २) जमाबंदी – ७२.८६ टक्क ३) आदिवासी – ७२.५७ टक्के ४) राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – ७०.१८ टक्के ५) वैद्याकीय शिक्षण – ६९.४३ टक्के
● सर्वोत्तम पोलीस अधीक्षक
१) पालघर – ९०.२९ टक्के २) गडचिरोली – ८० टक्के २) नागपूर (ग्रामीण) – ८० टक्के ३) जळगाव – ६५.७१ टक्के ४) सोलापूर ग्रामीण – ६४ टक्के
● सर्वोत्तम पोलीस परीक्षेत्र
१) कोकण – ७८.८६ टक्के २)नांदेड – ६१.१४ टक्के
● विभागांचा फलनिष्पत्ती अहवाल
१०० टक्के – १२ विभाग
८० ते ९० टक्के – १८ विभाग
६० ते ७९ टक्के – १० विभाग
६० टक्क्यांपेक्षा कमी – ८ विभाग
● १२ विभागांना १०० टक्के गुण
जलसंपदा, गृह, ग्रामविकास, पशुसंवर्धन, बंदरे, उच्च व तंत्रशित्रण, कामगार, वस्त्रोद्याोग, सांस्कृतिक कार्य, खनिकर्म, दुग्धव्यवसाय, रोजगार हमी योजना या १२ विभागांनी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करीत या अभियानात चमकदार कामगिरी केली आहे.
● १८ विभागांना ८० ते ९९ टक्के
ऊर्जा, उद्योग, महसूल, परिवहन, शालेय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, मदत व पुनर्वसन, विमानचालन, कौशल्य विकास, महिला व बालविकास, कृषी, मत्स्य नगरविकास-१, वैद्याकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, सहकार, राज्य उत्पादन शुल्क, सार्वजनिक आरोग्य या १८ विभागांनी ८० ते ९९ टक्के गुण मिळविले आहेत.
● १० विभागांना ६० ते ७९ टक्के गुण
मराठी भाषा, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा व स्वच्छता, पर्यटन, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, मृद व जलसंधारण, क्रीडा व युवक कल्याण, आदिवासी विकास आदी विभागांना ६० टक्क्यांहून कमी गुण मिळाले.
उपमुख्यमंत्र्यांचे विभाग नापास
मोहिमेत मुख्यमंत्री फडणवीस यांचा सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरविकास-२ विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अन्न व नागरी पुरवठा विभाग नापास झाला आहे. त्यांना अनुक्रमे २४, ३३ आणि ३४ टक्के गुण मिळाले. सामान्य प्रशासन विभागाने (सेवा) निर्धारित केलेल्या ३४ पैकी केवळ ८ मुद्दे मार्गी लावले. तर नगरविकास विभागाने २९ पैकी १० मुद्द्यांची पूर्तता केली असून, १९ मुद्दे प्रलंबित आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाला ६ पैकी केवळ २ मुद्दे पूर्ण करता आले आहेत.
ठाणे महापालिका पिछाडीवर
ठाणे : कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील ठाणे महापालिकेला स्थान मिळविता आलेले नाही. या संदर्भात ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.