बॉलीवूड स्टार अभिनेता शाहरूख खान याच्या वांद्रे पश्चिम येथील ‘मन्नत’ या राहत्या बंगल्यात काल गुरूवार विजेच्या पुरविठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने किरकोळ आग लागली. त्यानंतर बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला. आग किरकोळ स्वरूपाची असल्यामुळे त्वरित आगीला आटोक्यात आणले गेले. तसेच सुदैवाने यात कोणत्याही प्रकरची जीवीतहानी झालेली नाही.
या आगीबद्दल शाहरूखने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सुद्धा ट्विट केले आहे –
All safe on the house front. Thanx to all deptts concerned. ‘Now that the house is on fire let’s warm ourselves’ Didn’t seem viable though.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— SHAH RUKH KHAN (@iamsrk) November 21, 2013