मुंबई : अवघ्या ११ दिवसांपूर्वी ‘स्नॅपचॅट’वर मैत्री करून एका आरोपीने अल्पवयीन मुलीची अश्लील छायाचित्रे मिळवून तिचा लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीची अश्लील छायाचित्रे वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्या वडिलांना पाठवली होती. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘इन्स्टाग्राम’ आणि ‘स्नॅपचॅट’ ही समाजमाध्यमे अल्पवयीन मुलींसाठी धोकादायक ठरत आहेत. मुलींशी मैत्री करून त्यांना अश्लील छायाचित्रे देण्यास भाग पाडले जाते आणि नंतर याचा अश्लली छायाचित्रांच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करून लैंगिक छळ करण्यात येतो. अशीच एक घटना ॲन्टॉप हिल परिसरात घडली. पीडित मुलगी १५ वर्षांची असून ३० मे रोजी तिच्या वडिलांना एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला.

तुमच्या १५ वर्षीय मुलीची अश्लील छायाचित्रे माझ्याकडे आहेत. तुमच्या मुलीने जर आयुश नावाच्या मुलाशी बोलणे थांबवले नाही तर तिची छायाचित्रे मी वायरल करेन अशी धमकी त्याने मुलीच्या वडिलांना दिली. यानंतर त्या व्यक्तीने मुलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीची ३ अश्लील छायाचित्रे आणि एक अश्लील चित्रफित पाठवली. ते पाहून मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या मुलीची छायाचित्रे वायरल करू नये, मी मुलीला समजावेन असे त्यांनी त्या व्यक्तीला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीच्या वडिलांनी मुलीकडे विचारणा केली. पीडित मुलीची ‘स्नॅपचॅट’वर अर्जुन नावाच्या एका मुलाशी १९ मे रोजी मैत्री झाली होती. यानंतर अर्जुनने तिला बोलण्यात गुंतवले. नंतर तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला तिची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफित देण्यास भाग पाडले. यानंतर मुलीने वडिलांसमोर अर्जुनला फोन केला. तेव्हा आरोपीने पुन्हा तिला अश्लील छायाचित्रे वायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अर्जुनविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (ई), ६७ आणि ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला.