scorecardresearch

‘आपले सण जपा हो…’, रंगपंचमीच्या शुभेच्छा देणाऱ्या अमित ठाकरेंना नेटकऱ्यांनी केले ट्रोल

अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

amit thackeray, holi 2022, holi 2022 wishes, amit thackeray got trolled, amit thackeray facebook, अमित ठाकरे, होळी २०२२, अमित ठाकरे ट्रोल, अमित ठाकरे फेसबुक
मनसे नेते आणि विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांनी देखील फेसबुकवर कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच होळी आणि धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते, सेलिब्रेटी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. मनसे नेते आणि विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांनी देखील फेसबुकवर कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा देताना त्यांनी दिलेल्या कॅप्शनवरून ते ट्रोल झाले आहेत.

अमित ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर धुलिवंदनाच्या दिवशी एक फोटो शेअर केला होता. या फोटोत अमित ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय रंगात रंगलेले दिसत आहेत. त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘रंग नात्यांचा..! रंग आनंदाचा..! रंग पंचमीच्या मनापासून शुभेच्छा..!’ अमित ठाकरे यांनी फोटोला दिलेलं हे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कॅप्शनवरून काही सोशल मीडिया युजर्सनी त्यांना ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा- Video : …अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मय मांडलेकरनं थांबवलं

अमित ठाकरे यांच्या या फोटोवर कमेंट करताना काही युजर्सनी त्यांना, ‘आज रंगपंचमी नाही तर धुलिवंदन आहे’ असं म्हणत ‘मराठी सण जापा’ असं सांगितलं आहे. तर काहींनी ‘आज रंगपंचमी नाही तर धुलिवंदन आहे रंगपंचमी २२ मार्चला आहे’ अशी आठवण देखील करून दिली आहे. अमित ठाकरे यांच्या फोटोवरील या कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा- ‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “हा चित्रपट…”

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वीच राजकारणात पाऊल टाकलं आहे. राज ठाकरे यांच्यानंतर अमित यांच्याकडे मनसेचं आगामी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. अमित ठाकरे हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. लवकरच अमित ठाकरे बाबा होणार आहेत. याची माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns amit thackeray got trolled for giving holi 2022 wishes mrj

ताज्या बातम्या