दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय मजुरांचे कौतुक करताना दिसतात. अरविंद सावंत यांच्या या भूमिकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि नेते नितीन सरदेसाई यांनी अरविंद सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्रातील तरुणांच्या काम करण्याच्या क्षमेतवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. परप्रांतीय मजुरांची स्तुती करुनच तुम्ही थांबला नाहीत, तर तुम्ही महराष्ट्रात या स्वागत आहे, असे वक्तव्य केलं. आपण मुंबईचे महाराष्ट्राचे खासदार आहात हे विसरु नका” ही आठवण सरदेसाईंनी त्यांना करुन दिली आहे.

Uddhav Thackeray Statement on Devendra Fadnavis
“माझा अर्थखात्याचा अभ्यास, मी दिल्लीत जाऊन…”, फडणवीसांच्या स्वप्नाबाबत ठाकरेंचा मोठा दावा
Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण

“आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या संधीचा विचार केला पाहिजे. तो न करता परप्रांतीय किती चांगलं काम करतात याची स्तुती करता?” या शब्दात सुनावलं आहे. “करोना संकटामुळे परप्रांतीय मजूर आपआपल्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या पाठिशी भक्कमपणे उभं राहून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण तुम्ही अवहेलना केलेली जाणवते, हे चुकीचं आहे” असे सरदेसाई म्हणाले.

“तुम्ही महाराष्ट्रातील तरुणांची हेटाळणी केली आणि परप्रांतीयांचे गोडवे गायले. आपल्या मुलाला ‘कार्टा’ आणि दुसऱ्याच्या मुलाला ‘बाब्या’ बोलणं बंद करा” असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. “अरविंदजी तुम्ही मुंबईचे महाराष्ट्राचे खासदार आहात. दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी पाठवलं आहे. यापुढे परप्रांतीयांचे गोडवे गाणं बंद करा आणि महाराष्ट्रातील मुलं व्यवसायात कशी पुढे जातील यासाठी प्रयत्न करा” असा सल्ला दिला आहे.