मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले. रश्मी ठाकरेंनी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले, असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला. ते शनिवारी (७ जानेवारी) मुंबईत मनसेच्या सभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश महाजन म्हणाले, “आपण नेहमी म्हणतो राजहट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट. एक स्त्रीहट्ट उभा राहिला आणि एक महाविकासआघाडी तयार झाली. ही आघाडी तयार करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील नारद शरद पवार, झाकणझुले संजय राऊत यांचा समावेश होता. सत्तेशिवाय यांना करमत नाही. त्यामुळे या जोडगोळीने मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना पटवण्यासाठी एक काम केलं आणि उद्धव ठाकरेंच्या घरी सैरंध्रीने केस मोकळे सोडले.”

“सैरंध्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात रस नव्हता, तर…”

“सैरंध्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात रस नव्हता, तर मुलाला मंत्री करायचं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कारभार सुरू झाला. मुळात ‘औकात’ नसलेल्या माणसाला गादीवर बसवण्यात आलं. त्यांचं आजारपणही खरं होतं की खोटं माहिती नाही, पण कारभार त्यांच्या पत्नीला करायचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आजारी पाडण्यात आलं,” असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला.

हेही वाचा : “चित्रपट उद्योग काही हलवा नाही, जो…”; बॉलिवूड यूपीला नेण्याच्या चर्चांवरून संदीप देशपांडेंचं सूचक ट्वीट

“बायकोने इतका हस्तक्षेप केला की, यांचं मुख्यमंत्रीपद गेलं”

“महाभारतात धर्मराजाने आपलं सर्व राज्य, भाऊ, बायको पणाला लावले आणि युद्धात हरले. इथं मात्र, कारभार सुरू झाला आणि बायकोने इतका हस्तक्षेप केला की, नवऱ्याचं राज्य पणाला लागलं, मुख्यमंत्रीपद गेलं. अर्थात ते आलंच असं होतं की, जाण्याचं दुःख वाटण्याचं कारण नाही,” असाही आरोप महाजन यांनी ठाकरेंवर केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader prakash mahajan serious allegation on rashmi uddhav thackeray mention sharad pawar sanjay raut pbs
First published on: 08-01-2023 at 08:23 IST