कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आईच्या मृत्यूचे दुःख विसरुन स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेणारे पतंप्रधान आपल्याला पाहिजे. मात्र, आजही आईच्या पदराला धरुन राजकारण करणारा पंतप्रधान आपल्याला नको”, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता राहुल गांधींवर खोचक टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आता नकली शिवसेना राहिली आहे. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन. मात्र, आज त्यांचा मुलगा आणि परिवार पंजाला (काँग्रेसला) मतदान करणार आहे. हे या राज्याचं दुर्देव आहे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. ज्या गोष्टींचा खेद वाटायला हवा, त्या गोष्टींचा त्यांना अभिमान वाटत आहे. त्यांना आता हिंदू म्हणून घेण्याचीही लाज वाटायला लागली आहे. हिंदुहृदयसम्राट म्हणण्यासाठीही त्यांची जीभ कचरु लागली असून आता उबाठाची शंभर टक्के काँग्रेस झाली आहे”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Nitin Raut, Congress Leader Nitin Raut, cm Eknath shinde, Congress Leader Nitin Raut Accuses CM Eknath Shinde, Supporting BJP, Alleged Plot to changing Constitution, shivsena, congress,
नितीन राऊत यांचा मुख्यमंत्री शिदेंवर पलटवार, म्हणाले ” सरकार दलितांच्या आंदोलनाला..”
Ganesh Naik
“प्रोटोकॉलनुसार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, पण देवेंद्र फडणवीसच…”, आमदार गणेश नाईक यांचं विधान; म्हणाले, “मी ओपन बोलतो”
MP Suresh Gopi
भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने गायले काँग्रेसचे गोडवे; इंदिरा गांधींना म्हणाले, ‘मदर ऑफ इंडिया’
Chief Minister Eknath Shinde candid speech Shrikant Shinde is responsible for party organization
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती; श्रीकांत शिंदेंकडे पक्ष संघटनेची जबाबदारी
Dr Srikant Shinde as group leader of Shiv Sena
डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी
Ashok Gehlot, pm narendra modi,
पंतप्रधान मोदींच्या नावावर भाजपला स्पष्ट बहुमत नाही, आता मोदींनी…; अशोक गहलोत यांची जोरदार टीका
rahul gandhi
“मोदींना परमेश्वरानंच पाठवलंय, पण कशासाठी तर…”, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला!
narendra modi
वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन; म्हणाले, “त्याग, शौर्य आणि अन्…”

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट…”

मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा

“देशाचे कणखर आणि कर्तृत्वत्वान पंतप्रधान आपल्याला निवडायचे आहेत. आपल्या देशात गर्मी वाढल्यानंतर परदेशात जाणारा नेता आपल्याला नको आहे. २४ तास काम करणारे आणि १० वर्षात एकही सुट्टी न घेणारे पंतप्रधान आपल्याला पाहिजे आहेत. आईच्या मृत्यूचे दुःख विसरुन स्वतःला देशाच्या सेवेसाठी वाहून घेणारे पतंप्रधान आपल्याला पाहिजे आहेत. पण आजही आईच्या पदराला धरुन राजकारण करणारा पंतप्रधान आपल्याला नको”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर केली.