महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी करण्यात आली असून राज ठाकरेंचा महाराष्ट्र धर्म सम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती असून मुंबईत मनसेचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी मनसेकडून मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आल्याचं दिसत आहे. या पोस्टरवर ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं लिहिण्यात आलं आहे. मनसेची पोस्टरबाजी महत्त्वाचं म्हणजे या हे पोस्टर भगव्या रंगात असल्याने मनसे भाजपासोबत युती करण्याच्या तसंच भगवेकरण होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पोस्टरसंबंधी बोलताना मनसेचे सरचिटणीस यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रावर जेव्हा कधी संकट आलं आहे मग ते गोविंदा, गणेशोत्सव तसंच रजा अकादमीच्या गुंडांनी घातलेला दंगा असो तेव्हा राज ठाकरे आणि मनसे उभी राहिली आहे. तोच संदेश या पोस्टरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे”. यावेळी त्यांनी कोणालाही डिवचण्याचासाठी हे पोस्टर लावण्यात आलं असून आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे असं स्पष्ट केलं.

“आम्ही महाराष्ट्र धर्माचं पालन करत आहोत. सत्तेसाठी सगळे येत आहेत, पण महाराष्ट्र धर्माचं पालन होताना दिसत नाही. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी,” असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. पोस्टर भगव्या रंगात असल्याने झेंड्याचा रंगही बदलणार का असं विचारण्यात आलं असता संदीप देशपांडे यांनी झेंड्यासंबंधी कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. महाराष्ट्राचा उल्लेख असल्याने भगवा रंग वापरण्यात आला आहे. त्यासंबंधी अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असं सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray poster shivsena bhavan sandeep deshpande sgy
First published on: 17-01-2020 at 12:26 IST