लोकलमध्ये गर्दीत एका पायावर जेमतेम उभ राहाला मिळाले की लगेचच खिशातून मोबाइल बाहेर येतो आणि बोटांवर धावणारी ‘मोबाइल गेम’ची गाडी जोरात पळू लागते. लोकल वेळेत नाही पोहोचली तरी चालेल पण मोबाइलच्या खेळातील गाडी वेळेत पोहचावी यासाठी गर्दीतही मोबाइलकरांची धडपड सुरू असते. पण सध्या अशा वेगवान गेम्सबरोबरच पत्त्यांचे किंवा कोडय़ांच्या खेळही मोठय़ा प्रमाणावर दिसू लागले आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये पत्ते आणि इतर भारतीय खेळांच्या अॅप्सना अधिक पसंती मिळू लागली असून वेगवान गेम्सचा ‘पत्ता’ हळूहळू कट होऊ लागला आहे.
जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा सोबती झालेला मोबाइल आपल्या कामांबरोबरच मनोरंजनही करतो. गाणी, चित्रपट इतकेच नव्हे तर गेम्सच्या माध्यमातून आपल्या डोक्यावरील ताण हलका करण्यासाठी मोबाइल मदत करत असतो. यामुळेच मोबाइल गेम्सचा व्यवसाय चांगलाच तेजीत आला. युरोपीय देशांमध्ये विकसित होणारे गेम्स भारतात येऊ लागले आणि आपण भारतीय त्यात रमू लागलो. पण जेव्हा भारतीय उद्योगांना येथील ग्राहकांना भारतीय खेळ जर मोबाइलवर उपलब्ध करून दिले तर ते नक्कीच खेळतील, अशी कल्पना सुचली आणि त्यातून भारतीय गेम्स ऑनलाइन आणि नंतर मोबाइलवर उपलब्ध होऊ लागले. यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरत आहेत ते पत्त्यांचे खेळ.
पूर्वी सुट्टी म्हटले की दुपारी जेवणानंतर किंवा सुट्टीच्या आदल्या रात्री पत्त्यांचा खेळ बहुतांश इमारतींमध्ये रंगायचा. मात्र कालांतराने कामाच्या वेळा बदलत गेला आणि हे पत्ते खेळण्याचे प्रमाणही कमी होऊ लागले. पण आता आभासी जगातून लोक पुन्हा एकदा पत्त्यांचे डाव रंगवू लागले आहेत. रमीसर्कल, अल्टिमेट तीनपत्ती, अल्टिमेट रमी, अल्टिमेट पोकर, तीन पत्ती, इंडियन रमी अशा विविध गेम्सनी ऑनलाइन आणि मोबाइलमध्ये गर्दी केली आहे. हे गेम्स आपण आभासी जगातून आपल्या इतर मित्रांसोबतही खेळू शकतो. या गेम्सचे डाऊनलोड्स हे पन्नास लाखांमध्ये झाले असून अनेक रमी सर्कलसारख्या ऑनलाइन गेम्सचेही बत्तीस लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत.
पूर्वीच्या काळी आपण खेळलेला गेम पुन्हा एकदा ऑनलाइन जगतात आला तर तो खेळायला नक्कीच आवडतो, ही मानसिकता लक्षात घेऊन भारतात अनेक स्थानिक गेम्स ऑनलाइन विश्वात आणले जात आहेत, असे ‘प्ले गेम्स २४बाय ७’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पंडय़ा यांनी स्पष्ट केले. भारतात हे गेम्स अनेक प्रादेषिक भाषांत येणे हे या गेम्स बाजाराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे अनेक गेम्स भारतीय भाषांमध्ये आणले जात आहेत यामुळे वापरकर्ते आणखी त्याचा लाभ घेऊ शकतील, असा विश्वासही पंडय़ा यांनी व्यक्त केला.ादल्या रात्री पत्त्यांचा खेळ बहुतांश इमारतींमध्ये रंगायचा. मात्र कालांतराने कामाच्या वेळा बदलत गेला आणि हे पत्ते खेळण्याचे प्रमाणही कमी होऊ लागले. पण आता आभासी जगातून लोक पुन्हा एकदा पत्त्यांचे डाव रंगवू लागले आहेत. रमीसर्कल, अल्टिमेट तीनपत्ती, अल्टिमेट रमी, अल्टिमेट पोकर, तीन पत्ती, इंडियन रमी अशा विविध गेम्सनी ऑनलाइन आणि मोबाइलमध्ये गर्दी केली आहे. हे गेम्स आपण आभासी जगातून आपल्या इतर मित्रांसोबतही खेळू शकतो. या गेम्सचे डाऊनलोड्स हे पन्नास लाखांमध्ये झाले असून अनेक रमीसर्कलसारख्या ऑनलाइन गेम्सचेही बत्तीस लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत.
पूर्वीच्या काळी आपण खेळलेला गेम पुन्हा एकदा ऑनलाइन जगतात आला तर तो खेळायला नक्कीच आवडतो ही मानसिकता लक्षात घेऊन भारतात अनेक स्थानिक गेम्स ऑनलाइन विश्वात आणले जात आहेत, असे ‘प्ले गेम्स २४बाय ७’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पंडय़ा यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2016 रोजी प्रकाशित
वेगवान गेम्सचा ‘पत्ता’ कट
लोकलमध्ये गर्दीत एका पायावर जेमतेम उभ राहाला मिळाले की लगेचच खिशातून मोबाइल बाहेर येतो
Written by नीरज पंडित

First published on: 02-04-2016 at 02:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile game teen patti game game application