कुख्यात गुंड रवी पुजारी टोळीतील ११ गुंडांवर गुरुवारी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याअंर्तगत (मोक्का) गुन्हा दाखल केला. चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याबद्दल या गुंडांना अटक करण्यात आली होती.
ऑगस्ट महिन्यात चित्रपट निर्माते करीम मोरानी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर पुजारी टोळीने गोळीबार केला होता. त्यानंतर महेश भट्ट यांच्यावर गोळीबार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा डाव उधळून लावत एकूण १४ गुंडांना अटक केली होती. यापैकी ११ गुंडांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यांना ६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2014 रोजी प्रकाशित
रवी पुजारी टोळीतील ११ गुंडाना मोक्का
कुख्यात गुंड रवी पुजारी टोळीतील ११ गुंडांवर गुरुवारी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याअंर्तगत (मोक्का) गुन्हा दाखल केला.
First published on: 28-11-2014 at 04:50 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mocca to ravi pujari gangs 11 goons