नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोर्बे धरण भरून वाहू लागल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
माथेरानच्या निसर्गरम्य परिसरातील पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवरील मोर्बे धरण नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे असून त्याची क्षमता ४५० दशलक्ष लिटर्स आहे. शुक्रवारी सकाळी धरणातील जलसाठय़ाने ८८ मीटर पातळी गाठून ते वाहू लागले.  यावर्षी जोमदार पाऊस सुरुच असल्याने हे धरण भरले आणि पाण्याची चिंता मिटली.