मुंबई : यंदा दिवाळीत विक्रमी उत्पन्न मिळाल्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत महसुलाची भर पडली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार अद्याप न झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्मचाऱ्यांना ७ डिसेंबर रोजी पगार मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ११ डिसेंबर उलटल्यानंतरही कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा >>> बेस्टमुळे पूर्व-पश्चिम उपनगर अधिक जवळ; आणखी १० वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

राज्यव्यापी संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारच्या निधीवर एसटीच्या ८८ हजार कर्मचाऱ्यांचे कुटुंब अवलंबून आहे. मात्र कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने अनेकांचे हप्ते थकले आहेत. तसेच घरात किराणा सामान न भरल्याने परिस्थिती बिकट बनू लागली आहे. तसेच मुलांचा शैक्षणिक खर्च, घरच्यांचे आजारपण यावर खर्च करणे एसटी कर्मचाऱ्यांसाठी अवघड झाले आहे. डिसेंबर महिन्याची ११ तारीख उलटून गेली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळालेले नाही. यामुळे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून ८ डिसेंबर रोजी एसटी महामंडळाला ऑक्टोबर २०२३ च्या प्रतिपूर्तीपोटी ३२९.९४ कोटी रुपये निधी वितरित झाला आहे. तर, सोमवारी रात्री किंवा मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात मासिक वेतन वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली. तर, ९ आणि १० डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन वर्ग करता आले नसल्याचे एसटी अधिकऱ्याने सांगितले.