प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडली आहे. कोकिलाबेन अंबानी यांना एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोकिलाबेन अंबानी ९१ वर्षांच्या आहेत. कोकिलाबेन अंबानी या रिलायन्सचे संस्थापक स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांच्या त्या पत्नी आहेत. अद्याप रिलायन्स किंवा अंबानी कुटुंबाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यांचं वय वाढल्याने त्यांना आरोग्य विषयक तक्रारी सतावत आहेत. दरम्यान त्यांना नेमकं काय झालं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतं आहे?

जो व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये हे दिसून येतं आहे की कोकिलाबेन अंबानी यांना रुग्णवाहिकेतून आणलं जातं आहे, तसंच त्यांना एच. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती कुठल्या कारणामुळे बिघडली आहे? हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यांच्या वयोमानामुळे त्यांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवत आहेत असं समजतं आहे. तसंच या संदर्भात अंबानी कुटुंबानेही कुठलंही पत्रक जाहीर केलेलं नाही.

कोकिलाबेन अंबानी या रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या पत्नी आहे. मागच्या पाच दशकांहून अधिक काळ त्या अंबानी कुटुंबाचा आधार म्हणून ओळखल्या जातात. धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांनी कुटुंब एकसंध ठेवलं. कोकिलाबेन अंबानी या धार्मिक आचरण करणाऱ्या महिला आहेत. कठीण प्रसंगातही त्यांनी धीरुभाई अंबानींना योग्य पद्धतीने साथ दिली, तसंच मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनाही त्यांनी आईच्या भूमिकेतून एकत्र ठेवण्याचं काम केलं आहे.