पालघर- माहिम रोडवर कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. पाटीलवाडीजवळ हा अपघात झाला असून पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
बुधवारी पहाटे पालघरमधील माहिममधून तारापूर येथे जाणाऱ्या कारला भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळली. या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मृतांमध्ये वडराईतील एकाचा समावेश असून उर्वरित चार जण तारापूरमधील रहिवासी असल्याचे समजते. पाटीलवाडी रोडवर पानेरी नाल्याजवळील वळणावर हा अपघात झाला. हे पाच जण वसईत लग्नानिमित्त गेले होते. तिथून परतत असताना हा अपघात झाला. निकेश मोहन तामोरे (२५), किरण परशुराम पागधरे (३०), संतोष बहिराम (३७), दिपेश रघुनाथ पागधरे (२५), विराज वेताळ (२५) अशी या मृतांची नावे आहेत. विराज हा कार चालवत होता.
#Maharashtra: 5 dead after a car rammed into a tree in Palghar, near Patilwadi, early morning today. pic.twitter.com/X43M9m9c3s
— ANI (@ANI) February 7, 2018