पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम पारितोषिक; ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१७’

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१७’ चा बक्षीस समारंभ रवींद्र नाटय़ मंदिरात मोठय़ा उत्साहात व जल्लोशात शुक्रवारी पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या निनादात यंदाचा ‘मुंबईचा राजा’ घोषित करण्यात आला. ठाण्यातील पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘मुंबईचा राजा’ ठरले.  प्रतिस्पर्धी मंडळांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून गणेशोत्सव मंडळांमधील निकोप स्पर्धेची भावना वाढीस लागल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले.

पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि ‘वीणा वर्ल्ड’चे सुधीर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम ५१ हजार रुपये, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे याचे स्वरुप आहे. ‘विक्रोळीच्या बाल मित्र कला मंडळा’ला ‘पर्यावरणस्नेही सजावट’ हे विशेष पारितोषिक देण्यात आले. ‘वाचक पसंती’चा पुरस्कार तुर्भे येथील शिवछाया मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रदान करण्यात आला.

लिव्होसिन डी. एस. हर्बल लिव्हर टॉनिकचे प्रवीण गायकवाड, पाश्र्वगायिका उत्तरा केळकर, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकरी संजीव पाटील, ‘वीणा वर्ल्ड’चे सुधीर पाटील, अभिनेते अरुण कदम, व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्सचे प्रवीण शिर्के, आयकॉन अ‍ॅडव्हरटायझिंग अ‍ॅण्ड मार्केटिंगचे कमलेश शर्मा, गायक श्रीकांत नारायण, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिवाकर शेवते, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे एस, एन. मोकाशी, रिजन्सी ग्रुपचे संजय आग्रवाल व व्हीकी रुपचंदानी, गायक नंदेश उमप, अभिनेत्री मेधा मांजरेकर, अभिनेत्री आदिती सारंगधर, पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संजीव पालंडे आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘जीवनगाणी’ निर्मित ‘गण स्वरांगण’ या मराठी गाण्यांचा व नृत्यांचा विविधरंगी कार्यक्रम या वेळी सादर झाला. ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ (एलआयसी), व्ही. पी. बेडेकर अँड सन्स, रिजन्सी ग्रुप सहप्रायोजक असलेला हा कार्यक्रम लिव्होसिन डीएस हर्बल लिव्हर टॉनिक यांनी ‘पॉवर्ड बाय’ केला होता.

निकाल पुढीलप्रमाणे

’ मुंबईचा राजा भव्य पारितोषिक रु. ५१,००१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र

’ पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळ, ठाणे</p>

’ विशेष पारितोषिक- रिजन्सी ग्रुप पर्यावरणस्नेही मंडळ- पारितोषिक रु. १५,०००/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र

’ रिजन्सी ग्रुप पर्यावरणस्नेही सजावट – बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी

’ भारतीय आयुर्विमा महामंडळ (एल.आय.सी.) पर्यावरणस्नेही मूर्तीकार –

’ पारितोषिक रु. २,५००/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र

’  राजेश वारंणकर –  विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ, बोरिवली

’  वाचकांची पसंती – शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे ( मानचिन्ह व सन्मानपत्र)

’ विभागवार प्रथम पारितोषिक (रु. १५,००१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र)

’ विभाग : कुलाबा ते अंधेरी – न्यू एअरपोर्ट कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ले

’ विभाग : जोगेश्वरी ते दहिसर – नवतरुण मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, दहिसर

’ विभाग : सीएसटी ते मुलुंड –  विकास मंडळ (साई विहार) सार्वजनिक गणेशोत्सव, भांडूप

’ विभाग : ठाणे शहर –  पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे

’ विभाग : डोंबिवली – कल्याण –  सुनील नगर सामाजिक उत्सव मंडळ, डोंबिवली

’ विभाग : नवी मुंबई विभाग –  लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती, नेरुळ

’ सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन (रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र)

’ विभाग : कुलाबा ते अंधेरी – राजेश मयेकर – बाळगोपाळ मित्र मंडळ, विलेपाल्र्याचा पेशवा

’ विभाग : जोगेश्वरी ते दहिसर – चंद्रकांत शेडगे- श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,  कस्तूरपार्क, बोरिवली

’ विभाग : सीएसटी ते मुलुंड – सुमित पाटील- पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, डिलाईल रोड

’ विभाग : ठाणे शहर –   महेंद्र विश्वकर्मा / ओमप्रकाश सावंत-  हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे

’ विभाग : डोंबिवली-कल्याण – अमित ठोसर/अमोद चिटणीस – सुनील नगर सामाजिक उत्सव मंडळ, डोंबिवली

’ विभाग – नवी मुंबई – प्रसन्न कारखानीस / यशवंत पाटील – नवसाला पावणारा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, से. १७ वाशी

’ सवरेत्कष्ट मूर्तीकार (रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र)

’ विभाग : कुलाबा ते अंधेरी –   विजय बांदेकर- स्वप्नाक्षय मित्र मंडळ, मॉडेल टाऊन, अंधेरी

’ विभाग : जोगेश्वरी ते दहिसर – कृणाल पाटील- गोराई नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बोरिवली

’ विभाग : सीएसटी ते मुलुंड – संदिप गजकोश- बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी

’ विभाग :  विजेते : निळकंठ गोरे – गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा

’ विभाग : डोंबिवली-कल्याण –  पुरणभाई मेस्त्री – श्रीमंत बाल मित्र गणेश मंडळ, कल्याण

’ विभाग : नवी मुंबई –  दिपीका म्हात्रे- सीवुडस् रेसिडेंट वेल्फेअर असो. से. ४२, नेरुळ

’ सवरेत्कृष्ट संहिता लेखन (रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र)

’ विभाग : कुलाबा ते अंधेरी  – प्रविण शिरगावकर- श्री गणेश क्रीडा मंडळ, अंधेरी

’ विभाग : जोगेश्वरी ते दहिसर – भावेश नार्वेकर- जय महाराष्ट्र सेवा मंडळ, साई नगरचा राजा, कांदिवली

’ विभाग : सीएसटी ते मुलुंड – योगेश तळेकर- सहयोग मित्र मंडळ, भांडुप

’ विभाग : ठाणे शहर –  विजय कदम- हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे

’ विभाग : डोंबिवली- कल्याण –  प्रज्ञा रोझेकर – राजाजी पथ गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली

’ विजेते : नवी मुंबई – विजय कदम – शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे

’ वीणा वर्ल्ड प्रस्तुत लोकसत्ता सेलिब्रेशन मुव्हमेंट पारितोषिक विजेते

’ अमित भोईर (कल्याण), अवधुत कोरडे (कांदिवली), गौरव यादव (भायखळा), प्रतिक्षा राणे (डोंबिवली), विकास पाटील (ठाणे)