सात लाख रुपयांची मोटारसायकल एका संकेतस्थळावर अवघ्या साडेतीन लाख रुपयांमध्ये विकण्याची जाहिरात देऊन पैसे उकळणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली आहे. पोलिसांनी त्या दोघांकडून २० एटीएम कार्डे, ३४७ कोरे धनादेश, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त केली आहेत. हर्षित पारेख (३५) व दिगंबर जाने (२९) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
सायबर सेल विभागाला २१ एप्रिल रोजी या संदर्भात माहिती मिळाली होती. संबंधिताना दूरध्वनी करून बॅंकेच्या खात्यात रक्कम भरण्यास सांगितले जात होते. त्यानंतर पुन्हा काही ना काही कारणे देऊन आणखी पैशांची मागणी करण्यात येत असे. हे मोटारसायकल विकत घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्षात भेटत नसत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2015 रोजी प्रकाशित
पैसे उकळणाऱ्या दोन जणांना अटक
सात लाख रुपयांची मोटारसायकल एका संकेतस्थळावर अवघ्या साडेतीन लाख रुपयांमध्ये विकण्याची जाहिरात देऊन पैसे उकळणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली आहे.
First published on: 25-04-2015 at 04:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai crime news