मुंबईतील मुलुंड भागात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. वडील आणि आजोबावर चाकूने हल्ला करून २० वर्षीय तरुणाने इमारतीवरून उडी घेतली. या धक्कादायक घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना नेमकी कशी घडली. तरुणाने अचानक वडील आणि आजोबांवर हल्ला का केला? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत असून, एकाच वेळी तीन सदस्यांच्या मृत्यू झाल्याने मांगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातील नागरिक या घटनेनं हादरले आहेत.

मुलुंडमधील लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या वसंत ऑस्कर सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली. सुरुवातीला बिल्डिंगवरुन उडी मारल्यामुळे एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास पोलिसांना हे कळलं. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल व्हॅनमधून जखमी झालेल्या २० वर्षीय शार्दुल मिलिंद मांगले याला मुलुंडमधील अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. पोलिसांनी मृत तरुणाबद्दल अधिक चौकशी केली. त्यानंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने घरी वडील आणि आजोबांवरही हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Mumbai, Dead bodies of two children,
मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय
uncle rapes 18 Yr old niece in panvel
पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाचा पुतणीवर अत्याचार, आरोपीला अटक
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

शार्दुलने केलेल्या चाकू हल्ल्यात ५५ वर्षीय वडील मिलिंद सुरेश मांगले आणि ८५ वर्षीय आजोबा सुरेश केशव मांगले जखमी झाले होते. त्यांनाही पितापुत्रालाही अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, त्यांचाही करुण अंत झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दुहेरी हत्या आणि आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.