मुंबई : मुंबईत ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ च्या नवीन पाच रुग्णांची नोंद रविवारी झाली. ओमायक्रॉनच्या या नव्या उपप्रकाराने बाधित रुग्णांची संख्या मुंबईत ३३, तर राज्यभरात ५४ झाली आहे.

पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनुकीय अहवालामध्ये मुंबईत ‘बीए.४’ चे दोन, तर ‘बी.ए. ५’ चे तीन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना १० ते २० जून या काळात करोनाची बाधा झाली होती. सर्वात जास्त म्हणजे तीन रुग्ण हे २६ ते ५० वयोगटातील आहेत, तर ५० वर्षांवरील एका आणि  १८ वयोगटातील एका रुग्णाचा समावेश आहे. रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन स्त्रिया आहेत.

६७ हजार मुलांना दोन्ही मात्रा..

१२ ते १४ वयोगटातील मुलांना कोबरेव्हॅक्स ही लस दिली जाते. २८ दिवसांच्या अंतराने दुसरी मात्रा दिली जाते. आतापर्यंत अंदाजे २ लाख मुलांना ही लस देण्यात आली. त्यापैकी ६७ हजार मुलांना दोन्ही मात्रा पूर्ण केल्या आहेत. तर एक लाख ३४ हजार मुलांनी पहिली मात्रा घेतली आहे.

व्हिडीओ पाहा –

ठाणे जिल्ह्यात १,३०६ जणांना संसर्ग

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी १ हजार ३०६ नवे करोना रुग्ण आढळले, तर एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. या रुग्णांपैकी ठाणे ५१४, नवी मुंबई ४५१, कल्याण – डोंबिवली १३३, मीरा भाईंदर १०३, ठाणे ग्रामीण ७०, उल्हासनगर २९ आणि भिवंडी पालिका क्षेत्रात सहा करोना रुग्ण आढळले. सद्य:स्थितीत जिल्ह्याच्या सक्रिय करोना रुग्णांची संख्या ५ हजार ४२५ आहे.

राज्यात ६,४९३ नवे बाधित भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संकेतस्थळामध्ये  शनिवारी तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे शनिवारच्या रुग्णांची नोंदही रविवारी झाली आहे. परिणामी रविवारी राज्यात रविवारी ६ हजार ४९३ रुग्णांची नोंदले आहेत. मुंबईत २ हजार ७७१ रुग्ण नव्याने आढळले आहेत. रविवारी मृतांचा आकडाही काही अंशी वाढला आहे.  रविवारी पाच मृत्यू नोंदले असून ते मुंबईतील आहेत. मुंबईत मृत्यू झालेल्या पाच रुग्णांमध्ये चार पुरुष आणि एका स्त्रियांचा समावेश आहे. चारही पुरुष ६० वर्षांवरील होते, तर महिलेचे वय ४३ वर्षे होते.  रविवारी राज्यभरात ६ हजार २१३ रुग्ण करोनामुक्त झाले.