मुंबई: सात वर्षांच्या मुलीच्या मीडिआस्टिनममध्ये वाढलेला ट्युमर काढून टाकण्याची गुंतागूंतीची आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे थोरॅकोस्कोपिक (मिनिमली इन्व्हेजिव्ह) शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या पार पाडली.

या लहानग्या रुग्णाच्या श्वसनमार्गाची खालील बाजू तीन महिन्यांपूर्वी संसर्गबाधित झाली होती व रेडिओलॉजिकल तपासण्या केल्या असता हृदयाच्या पोकळीमध्ये दोन फुफ्फुसांच्या मध्यभागी म्हणजे मीडियास्टिनममध्ये ट्युमर तयार झाल्याचे (मीडिआस्टिनल मास म्हणजे फुफ्फुसांच्या दरम्यान, छातीच्या हाडाच्या मागे आणि मणक्याच्या समोर असलेल्या छातीच्या पोकळीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मेडियास्टिनममध्ये स्थित एक असामान्य वाढ किंवा जखम.) निदान झाले. अल्ट्रासाउंड तपासणीच्या माध्यमातून केलेल्या बायोप्सीमधून हे निदान पक्के झाल्यानंतर ट्युमरचे गुंतागूंतीच्या ठिकाणी असणे लक्षात घेऊन सर्जिकल टीमने थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले.

हे मास एका बाजूला व पाठीच्या दिशेने, पाठीच्या मणक्यातील डी १०-एल १ या हाडांना लागून वाढले होते, श्वासपटलाच्या बाजूला असलेल्या या ट्युमरचा काही भाग या पडद्याच्या वर व काही भाग पडद्याच्या खाली होता. ट्युमर महाधमनी म्हणजे आओर्टा आणि सर्वात मोठी लसिका वाहिनी म्हणजे थोरॅसिक डक्ट यांच्या खूपच जवळ होता.ओपन सर्जरीद्वारे या भागापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होते. थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे टीमला हा ट्यूमर त्याच्या आवरणासह पूर्णपणे काढून टाकणे व हे करताना छाती व पोटातील मुख्य संरचना सुरक्षित ठेवणे शक्य झाले, ज्यामुळे जीवघेण्या गुंतागूंती टाळता आल्या.

ही प्रक्रिया विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका मल्टिडिसिप्लिनरी टीमच्या देखरेखी खाली पार पाडण्यात आली, ज्यात सहभागी असलेल्या पीडिअॅट्रिक अॅनेस्थेटिस्ट्सनी शस्त्रक्रियेदरम्यान वेदनांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत केली. रुग्णाच्या तब्येतीमध्ये कोणत्याही अडथळ्याविना सुधारणा झाली, शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच दिवशी तिने तोंडाने अन्न घेणे सुरू केले, दुसऱ्या दिवशी ती चालू लागली व तिसऱ्या दिवशी तिला घरी पाठविण्यात आले.

या शस्त्रक्रियेविषयी पीडिअॅट्रिक सर्जरी विभागाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. रसिक शाह म्हणाले, “लहान मुलांमधील थोरॅकोअॅबडॉमिनल ट्युमरवरील उपचारांत प्रचंड नेमकेपणा आणि देखभालीची आवश्यकता असते. या प्रकरणामध्ये ट्यूमर आओर्टा, थोरॅसिक डक्ट आणि श्वासपटल यांच्यासारख्या नाजूक भागांजवळ होता आणि त्याचा काही भाग पोटातही असल्याने हे प्रकरण विशेषत्वाने आव्हानात्मक होते. थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे कोणत्याही हानीशिवाय अचूकतेने ट्यूमर काढणे शक्य होतेच पण त्याचबरोबर ओपन शस्त्रक्रियेच्या तुलनेत दिसण्याच्या दृष्टीने शरीरावर मोठा व्रण होत नाही, वेदना कमी होतात व रुग्ण लवकर बरा होतो.