क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एकीकडे जामीनासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे एनसीबी मात्र वेगाने कारवाई करत आहे. आर्यन खानच्या चॅटमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाल्यानतंर तसंच काही नावं समोर आल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा कारवाईला वेग आला आहे. एनसीबीकडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यादरम्यान एनसीबीचं एक पथक शाहरुख खानच्या घरी मन्नतवर पोहोचलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी बातमी! एनसीबीचं पथक शाहरुखच्या घरी ‘मन्नत’वर; दिली नोटीस

एनसीबीचे अधिकारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर दाखल झाले होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एनसीबीने यावेळी नोटीस दिली असून आर्यन खानशी संबंधित इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तपासासाठी तपास यंत्रणेकडे सादर करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. मोबाइल फोनमधील चॅटमधून महत्वाची माहिती लागल्यानंतर इतर गोष्टींमधूनही काही खुलासे होऊ शकण्याची शक्यता एनसीबीला वाटत आहे.

अनन्या पांडेच्या घरावरही छापा

एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा छापा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

साधी कार, अचानक भेट आणि १० मिनिटांची चर्चा; शाहरुख-आर्यन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

शाहरुख आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात

बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे गुरुवारी सकाळी आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता.

करोना काळात जेलमधील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले असून नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे. यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आलं. २ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटला.

शाहरुख खान येणार असल्याची कोणालाही माहिती नव्हती. अचानक सकाळी ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी किंवा मुलगी नव्हती. फक्त खासगी सुरक्षारक्षक त्याच्यासोबत होते. यानंतर नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी आहे त्या गेटमधून शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला. शाहरुख खानने आर्यनला भेटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोहोचला होता. जवळपास १५ ते २० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांसमोर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai drugs case ncb notice shahrukh khan aryan khan electronic devices sgy
First published on: 21-10-2021 at 13:49 IST