मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील अनमोल प्राईड या गगनचुंबी इमारतीत बुधवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास आग लागली. गोविंदजी श्रॉफ मार्गावरील या गगनचुंबी इमारतीतील गच्चीला लागून असलेल्या सदनिकेत ही आग लागली होती. या इमारतीची अग्निरोधक यंत्रणा बंद असल्याचे बचाव कार्याच्या वेळी अग्निशमन दलाच्या जवानांच्या निदर्शनास आले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

हेही वाचा >>> आरोग्य विभागाकडून अर्थसंकल्पात १६,१३३ कोटींची मागणी! , अर्थसंकल्पाच्या ८ टक्के निधी आरोग्याला हवा….

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

गोरेगाव पश्चिम परिसरातील अनमोल प्राईड या २७ मजली इमारतीच्या २६ व्या मजल्यावर बुधावारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास अचानक आग लागली. गच्चीला लागून असलेल्या पेंट हाऊसमध्ये ही आग लागली होती. घटनास्थळी ७ फायर इंजिन, ४ मोठे टँकर आणि अग्निशमन दलाचा ताफा दाखल झाला होता. इमारतीची अग्निरोधक यंत्रणा सुरू नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर पाणी फवारणारी यंत्रणा वरच्या मजल्यावर घेऊन जावी लागली होती. या दुर्घटनेत कोणीही अडकले नव्हते किंवा जखमी झाले नसल्याची माहिती पी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.