कागदाचा कमीत कमी वापर करत “पर्यावरण वाचवा” हा संदेश देण्यासाठी यासाठी मुंबई हायकोर्टाने हिरव्या रंगाचा लेजर फूलस्केप साईज पेपरऐवजी दोन्ही बाजूंनी छापलेले ए ४ आकाराचे पेपर वापरुन वकिलांना बाजू मांडण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश एस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने अ‍ॅडव्होकेट अजिंक्य मोहन उदाणे यांच्या बाजूने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. ए४ कागदाचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होईल आणि यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे वाचतील, असे उदाणे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई हायकोर्टाने कागदांचा वापर कमी करण्यासाठी ए४ आकाराचे कागद वापरण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता हिरव्या रंगाच्या ऐवजी पांढऱ्या ए४ कागदावर याचिका, अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल करता येणार आहेत. पांढऱ्या रंगाच्या ए४ कागदावर दोन्ही बाजूला मजकूर छापता येणार आहे.

वकील असणाऱ्या अजिंक्य उदाने यांनी न्यायालयिन आणि प्रशासकिय कामासाठी हिरव्या रंगाऐवजी ए४ आकाराचे कागद वापरण्यात यावे अशी मागणी करत याचिका दाखल केली होती. याचिकेत दावा करण्यात आला होता की, ए४ आकाराच्या पेपरमुळे मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होते. तसेच यामुळे पर्यावरण रक्षणालादेखील हातभार लागेल.

दरम्यान, कोर्टाने चांगल्या गुणवत्तेचे (७५ जीएसएम) ए४ आकाराचे कागद वापरण्याची अधिसूचना काढली आहे. या कागदांच्या दोन्ही बाजूला छापण्यास परवानगी देण्यात आली आहे. हायकोर्टाकडून जारी करण्यात आलेला हा आदेश राज्यातील सर्व कोर्टांमध्ये लागू करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court allowed the use a four size paper file petition abn
First published on: 14-07-2021 at 20:49 IST