नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ म्हैसकर (वय २२) याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मलबार हिलमधील दरिया महल या इमारतीवरुन  उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ हा मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघाला. साडे सातच्या सुमारास नेपियन्सी रोडवरील दरिया महल या इमारतीमधून एका तरुणाने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता आत्महत्या करणारा तरुण म्हैसकर दाम्पत्याचा मुलगा मन्मथ असल्याचे  समोर आले. पोलिसांनी या घटनेची माहिती म्हैसकर दाम्पत्याला दिली आहे. मन्मथ हा म्हैसकर दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत. तर मनीषा म्हैसकर या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव आहेत. मन्मथचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आला आहे. मन्मथच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मात्र या वृत्ताला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.