Mumbai Local Train Batman Ticket Checking: मुंबई लोकलमधून प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणे हे दुर्दैवाने काहींना अत्यंत गौरवाचे वाटते. अनेकदा तुम्ही अशा बढाया मारणाऱ्या प्रवाशांना भेटला असाल. मागील काही काळात, विशेषतः रात्री ८ वाजल्यानंतर तिकीट तपासनीसांची उपस्थिती कमी असल्याने विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढली आहे. या फुकट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक तिकीट तपासणीसांचा विशेष गट तयार केला आहे. या संघाला ‘बॅटमॅन स्क्वाड’ असे नाव देण्यात आले आहे, ज्याचा अर्थ ‘बी अवेअर टीटीई मॅनिंग ॲट नाईट’ असा आहे. सुपरहिरो बॅटमॅनच्या चाहत्यांना ही कल्पना चांगलीच भावतेय.

महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा ‘बॅटमॅन सज्ज’

नवभारत टाइम्सच्या मूळ वृत्तानुसार, ११ मार्चच्या रात्री बॅटमॅन पथकाची गस्त सुरू झाली. या मोहिमेची सुरुवात झाल्यापासून अंदाजे २५०० तिकीटविरहित प्रवाशांना पकडण्यात आले आहे ज्यातून रेल्वेला सुमारे ६.५० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. प्रवासी विना तिकीट प्रवास करणार नाहीत याकडे लक्ष देणे ही बॅटमॅन संघाची प्राथमिक जबाबदारी असली तरी रात्रीच्या वेळी स्थानकांवर होणाऱ्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सुद्धा या संघाकडे असेल. तसेच, तिकीट तपासनीस हे रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात सुद्धा गस्त घालणार असल्याने यामुळे एकाअर्थी महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री मिळू शकते.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

हे ही वाचा << करी रोड स्टेशनचं नाव ‘आमटी’ वरून ठरलंय? लोकांनी रागाने का पेटवलं होतं रेल्वे स्टेशन, आता नवी ओळख काय?

एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या डोक्याला ताप

दरम्यान, मुंबई लोकलच्या एसी लोकलमध्ये रात्री ८ नंतर विना तिकीट किंवा जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने रेल्वेच्या डोक्याचा ताप वाढला आहे. एसी लोकलसाठी जनरल तिकिटाच्या पाच पटीने रक्कम खर्च करूनही प्रवाशांना फक्त जनरल तिकीट किंवा विना तिकीट एसी लोकलमध्ये चढणाऱ्या गर्दीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकदा फोटो व व्हिडीओ पोस्ट करून रेल्वेकडे तक्रारी येत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आता पश्चिम रेल्वेचे ‘बॅटमॅन पथक’ सज्ज असणार आहे.