मुंबईकरांना दिलासा, फक्त पश्चिम रेल्वेच्या मार्गावर ब्लॉक

मुंबईकर सततच्या संपामुळे हैराण झाले आहेत

वाहतूक कोंडी, गर्दी, उकाडा, घाम आणि सततची धावपळ यांमुळे आगोदरच जेरीस आलेले मुंबईकर सततच्या संपामुळे हैराण झाले आहेत. सलग सहाव्या दिवशीही बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांचा संप (BEST Strike ) सुरु आहे. बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत असताना मध्य रेल्वेने रविवारी मुख्य मार्ग, हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेने रविवारी चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान अप आणि डाऊन मंदगती मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत ब्लॉक घेतला आहे. इगतपुरी आणि बदलापूर-कर्जतदरम्यान आज रविवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्याचा उपनगरीय गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही. दरम्यान, उपनगरीय लोकल गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकलची संख्या कमी असणार आहे.

दरम्यान, मुंबईतील संपावर वेळीच तोडगा निघाला नाही तर, मुंबईकरांच्या अडचणींची जागा हाल या शब्दात व्यक्त करण्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. बेस्टच्या बसेस सुरु नसल्याने मुंबईची वाहिणी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर अधिक ताण पडतो आहे.

मध्य रेल्वेच्या बदलापूर-कर्जत दरम्यान विशेष ट्राफीक ब्लॉकमुळे बदल करण्यात आलेल्या लोकल –

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai local train no mega block on central harbur railway on 13th jan

ताज्या बातम्या