गेहू, चना, वाल, पिझ्झा सॉस, दूध मसाला, रवा.. बाजारहाट करणाऱ्यांना ही यादी परिचित आहे. मात्र ही यादी मुंबईच्या महापौरांच्या लेटरहेडवर असल्यामुळे तिला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, महापौरांचे लेटरहेड ग्रॅन्ट रोडमधील वाण्याकडे पोहोचले कसे हा प्रश्न गुलदस्त्यातच राहिला आहे.ग्रॅन्ट रोड येथे राहणारे रघुनाथ सावंत गेल्या आठवडय़ामध्ये नाना चौकातील भाजीगल्लीमधील ‘रतनशी मानशी’ या किराणा मालाच्या दुकानात काही सामान आणण्यासाठी गेले होते. गहू, चणे, वाल, पिझ्झा सॉस, दूध मसाला, रवा खरेदी केल्यानंतर त्यांनी ५८३ रुपये दिले आणि वाण्याकडे बिल मागितले. वाण्याने नेहमीच्या सवईने पॅड उचलले आणि त्यावरील कागदावर जिन्नसांची यादी लिहून रघुनाथ सावंत यांच्या हातात टेकवले. लेटरहेडच्या पाठकोऱ्याभागावर वाण्याने ‘रतनशी मानशी’, ग्रेन अ‍ॅण्ड किराना र्मचट, १७, शंकर शेठ रोड, ग्रॅन्ट रोड, मुंबई – ४००००७ हा आपल्या दुकानाचा पत्ताही रबर स्टॅम्पद्वारे उमटविला आहे.
साहित्य घेऊन ते घरी आले आणि त्यांनी खिशातील यादी तपासली. मुंबईच्या महापौरांच्या लेटरहेडच्या पाठकोऱ्या बाजूवर वाण्याने लिहून दिलेली यादी पाहून त्यांना धक्काच बसला. महापौरांच्या लेटरहेडचे मधून दोन भाग करण्यात आले असून रघुनाथ सामंत यांना मिळालेल्या यादीच्या पाठीमागे पालिकेचा लोगो आणि त्याखाली महापौर, मुंबई, तसेच तळाला महापौर निवासाचा पत्ता नमूद करण्यात आला आहे. महापौरांचे कोरे करकरीत लेटरहेड वाण्याकडे पोहोचलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mayor letterhead found in retail shopkeeper written with food grain list
First published on: 17-07-2013 at 04:24 IST