देशभरासह राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू होत आहे. याबाबत आज (मंगळवार) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना माहिती देताना, लसीकरणासाठी मुंबई मनपा सज्ज असल्याचं सांगितलं. मात्र लसींचा पुरवठा देखील त्याप्रमाणात होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी बातमी! मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे उद्या कार्यान्वित होणार

महापौर पेडणेकर म्हणाल्या, आपण जर प्रत्येक वॉर्डसाठी एक लसीकरण केंद्र देण्याचं ठरवलं तर, लसीकरणाचं प्रमाण वाढणार आहे. खासगी रूग्णालयांना देखील आपण लसीकरणासाठी परवानगी देतो आहोत. त्यामुळे प्रत्येकजण आपलं मनुष्यबळ घेऊन तयार देखील राहणार, पण तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का? ज्या पद्धतीने मागील काही दिवस जशी लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणे आपण लसीकरण करत आहोत. लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली व जर लसच तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल.

मुंबईकरांनी आधी लस उपलब्धतेची खात्री करूनच लसीकरणासाठी जावं – महापौर किशोरी पेडणेकर

तसेच, आपल्याला १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस द्यायचीच आहे. मात्र लसीकरणाचा साठा आल्यानंतर जे ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड लोकं आहेत आणि जे ६० वर्षांवरील आहेत. ज्यांचा आता दुसरा डोस सुरू आहे. हा कार्यक्रम देखील त्याच वेळी आपल्याला चालवावा लागणार आहे. त्यामुळे अद्यापही राज्य सराकार व मनपा यांच्यात बैठका सुरू आहेत. १ मे पासून लसीकरण निश्चितच सुरू होणार पण ते सुरू होत असताना, कुठे होणार? कुठल्या ठिकाणी पहिल्यांदा सुरू होणार? याबाबत काही जणांच्या सूचना देखील आल्या आहेत. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये लसीकरणाची विभागणी करावी लागणार आहे. सर्व वयोगट एकत्र करणं हे उचित ठरणार नाही. कोविन अॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतरच व लस मिळत असल्याची खात्री झाल्यावरच लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने गेलं पाहिजे. आयुक्तस्तरावर सध्या चर्चा सुरू आहे, अंतिम टप्प्यात जेव्हा सगळी गाईडलाइन येईल तेव्हा सर्वांना माहिती दिली जाईल. असं देखील महापौर पेडणेकर यांनी यावेळी सांगितलं

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation is ready for vaccination but mayor pednekar msr
First published on: 27-04-2021 at 13:20 IST