मुंबईतील सार्वजानिक वाहतूक सेवा कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांच्या कष्टाची कमाई मुंबई महापालिका प्रशासनातील काही अधिकारी व कंत्राटदार लुटण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी केला आहे. तसेच महानगरपालिका प्रशासनचा कामगारांच्या आयुष्याशी व त्यांच्या भविष्याशी खेळ सुरु असून खासगी कंत्राटदारांना हाताशी धरुन पालिका प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांचा थेट भविष्य निवाह निधी हडप करत असल्याचेही योगेश यांचे म्हणणे आहे. योगेश यांनी यासंदर्भात केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे तक्रार करत पत्र दिले आहे.

चौकशीची मागणी

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीत तब्बल १९० कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे. तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा जवळपास साडेसहा कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त गंभीर नाही. तसेच राज्य सरकार याबाबत गांभीर्याने विचार करीत नाही. यामुळे या गोटाळ्याकडे लक्ष वेधत आपण याची दखल घेत चौकशी करावी, अशी मागणी सादर यांनी पत्राद्वारे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.