विलेपार्ले पूर्व येथील एका चाळीतील घरात मंगळवारी पहाटे सहा वाजता सिलिंडरचा स्फोट झाला. यादुर्घटनेत पाच जण जखमी झाले. विलेपार्ले पूर्वेकडे पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ असलेल्या न्यु कल्पना चाळीत मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अमर राय (२७), जयराम यादव (२७), हरेकुमार राय (३८), राकेशकुमार राय (३०), अजय कुमार राय (४५) हे पाच जण जखमी झाले. या पाचही जणांना विलेपार्ले येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.