मुंबईतील ‘हॉटेल द ललीत’मध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवले असून त्यांचा स्फोट होऊ नये यासाठी पाच कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी वलसाड येथून एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. धमकी आल्यानंतर हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हॉटेल द ललीत’मध्ये सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास फोनवरून धमकी देण्यात आली होती. यानंतर हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने हॉटेमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. तसेच हॉटेलमध्ये ठेवलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडीणीची मागणी करण्यात आली. याशिवाय हॉटेलच्या महाव्यवस्थापकाच्या कुटुंबियांनाही धमकावण्यात आले होते.

हॉटेल प्रशासनाने या धमकीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३८५, ३३६ आणि कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास करणाऱ्या सहा पोलिसांनी गुजरामधील वलसाड येथून एकाला अटक केली असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. यापूर्वी वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षालाही धमकीचे संदेश आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai one person from gujarat arrested in case of bomb threat in hotel the lalit mumbai print news msr
First published on: 24-08-2022 at 11:46 IST