मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मात्र, जुलैच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा मुंबईत मुक्काम कायम होता. परिणामी, गेल्या सात दिवसांमध्ये (७ ते १४ जुलै) मुंबई उपनगर आणि शहरामध्ये सरासरीपेक्षा अनुक्रमे ३६२ टक्के व ३२१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जूनमध्ये पावसाने ओढ घेतल्यामुळे पावसाच्या सरासरी प्रमाणात ३१ टक्के तूट नोंदली गेली. जुलैच्या सुरुवातीपासूनच पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही तूट भरून निघाली. १ जून ते १४ जुलै या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा ४४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. या कालावधीत राज्यात सामान्यपणे ३४९.८ मि.मी. पाऊस पडतो. मात्र यंदा ५०३.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. याच कालावधीत मुंबई उपनगर आणि शहरात सरासरीपेक्षा अनुक्रमे ३४ टक्के, १० टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरांत सामान्यपणे ९१३.२ मि.मी. पाऊस पडतो. तर, यंदा १ हजार २२२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात सामान्यपणे ८८५ मि.मी. पाऊस पडतो. यंदा ९७६.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमधील जलसाठा ७४.८२ टक्क्यांवर

दरवर्षी ७ ते १४ जुलै या काळात मुंबई उपनगर आणि शहरात साधारणत: अनुक्रमे २०.६ मि.मी., १६.४ मि.मी. पाऊस पडतो. मात्र यंदा अनुक्रमे ९५.२ मिमी आणि ६९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

आज (शुक्रवार) सकाळी साडेआठवाजेपर्यंत (मागील २४ तासांत) घाट भागातील पावसाच्या नोंदी –

लोणावळा २०२ मि.मी.
शिरगाव १९६ मि.मी.
आंबोने २२२ मि.मी.
दावडी २२२ मि.मी.
धुंगेरवाडी १७५ मि.मी.
खेड २१३ मि.मी.
भिरा १०० मि.मी.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai received above average rainfall during the week mumbai print news msr
First published on: 15-07-2022 at 11:26 IST