मुंबईच्या डबेवाल्यांच्या पर्यावरणपूरक सायकलला स्वतंत्र मार्गिक, सायकलसाठी सुरक्षित वाहनतळ, रेल्वे स्थानकावर सोयीस्कर ये-जा करण्याची सुविधा मिळायला हवी, असे वातावरण फाऊंडेशन यांनी नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.नोकरदार, व्यापाऱ्यांना दुपारी घरचा जेवणाचा डबा पोहोचविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे वाहतुकीचे मुख्य साधन सायकल आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील नऊ भागांमधील सुविधांबाबत ५०० पैकी २२० डबेवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सायकल आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधा आणि डबे पोहोचवताना डबेवाल्यांना येणाऱ्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सर्वेक्षणाचे नुकसाच अनावरण केले.

हेही वाचा >>>“राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे…”, सावरकरांच्या अपमानावरून शेलारांचा हल्लाबोल; म्हणाले…

मुंबईतील डबेवाले कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या शहराच्या प्रयत्नांना हातभार लावत आहेत. चांगली बाब आहे. ९२ टक्के डबेवाले वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर करीत आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या वातावरण बदल समितीसाठी हे सर्वेक्षण एक सर्वसमावेशक दस्तावेज ठरेल, असा आशावाद राहुल नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला.मुंबईच्या डबेवाल्यांना मोठ्या पाठबळाची गरज असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सुरक्षित वाहनतळ, सर्वसमावेशक पायाभूत सुविधा आणि स्वतंत्र सायकल मार्गिकेची गरज आहे. तसेच डबेवाल्यांसारख्या अन्य व्यवसायांबाबत सर्वेक्षण करणे आवश्यक आहे, असे ‘वातावरण’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान केसभट म्हणाले.

हेही वाचा >>>अंधेरीच्या गोखले पुलाबाबत महानगरपालिकेचे आयआयटी आणि व्हीजेटीआयला पत्र

मुंबई सायकलसमावेशक पायाभूत सुविधा असलेले शहर बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे मुंबईकर सायकलचा वापर करण्यास प्रवृत्त होतील. अन्य वाहनांच्या तुलनेत सायकलसाठी वाहनतळ उभारणे सोपे आहे, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले.

मुंबईमध्ये चर्चगेट, मरिन लाईन्स, ग्रॅन्ट रोड, परेल, दादर, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर आणि न्या नऊ ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले.

८९ टक्के डबेवाल्यांनी मुंबईत स्वतंत्र सायकल मार्गिकेची मागणी केली.

घरपोच सेवा देणाऱ्यांनी सायकलचा वापर केल्यास हवेची गुणवत्ता सुधारेल, असे ८६ टक्के डबेवाल्यांचे म्हणणे आहे.

६३ टक्के डबेवाले डबे पोहोचविण्यासाठी एका दिवसात १२ किमीहून अधिक लांबपर्यंत सायकल चालवतात.

७४ टक्के डबेवाले त्यांच्या वाहतुकीसाठी सायकल आणि लोकल या दोन्ही वापरतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डबे वाहतूक करण्यासाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा आणि स्थानकात ये-जा करण्यासाठी रॅम्प उपयुक्त ठरतील, असे ६८ टक्के डबेवाल्यांनी सांगितले.