प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसची सेवा तात्पुरती रद्द करण्यात येत असल्याची माहिती इंडियन रेल्वे कॅटिरग अ‍ॅण्ड टूरिझम कॉपरेरेशने दिली. ही सेवा २४ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात येणार आहे.

टाळेबंदीत लांब पल्ल्याच्या गाडय़ाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला फक्त श्रमिकांसाठी मेल-एक्स्प्रेस चालवण्यात आल्या. त्यानंतर विशेष गाडय़ांची सेवाही सुरू केली. या सेवेबरोबरच १७ आक्टोबरपासून मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसही चालवण्यात आली. प्रवासादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना सॅनिटायझर किट देण्यात आले. तर एक्स्प्रेसमधील कर्मचाऱ्यांनाही मुखपट्टी, हातमोजांचा वापर बंधनकारक करण्यात आला. सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेऊनही तेजस एक्स्प्रेसची दररोज २५ ते ४० टक्केच तिकिटे आरक्षित होत होती. त्यामुळे आयआरसीटीसीला मोठा तोटाही सहन करावा लागत होता. याच मार्गावर शताब्दी, राजधानी व डबल डेकरही धावत असल्याने तेजसलाही त्याचा फटका बसला.

Vande Bharat, Tejas Express,
पावसाळ्यात वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार
mumbai coastal road marathi news, mumbai coastal road project
महाकाय तुळई समुद्रात स्थापन, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी
Raigad, Private bus caught fire,
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात

तोटय़ामुळे दर मंगळवारची तेजस एक्स्प्रेसची सेवा रद्द करण्यात आली. त्यानंतरही प्रवाशांची संख्या कमीच होत गेल्याने आयआरसीटीसीने तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला. त्यावर बोर्डाने निर्णय देताना मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसच्या सर्व सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द केल्या आहेत.

आयआरसीटीसीने मुंबई ते अहमदाबाद मार्गावर तेजस एक्स्प्रेस १९ जानेवारीपासून सुरू केली होती. या सेवेकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.