scorecardresearch

मुंबई : तरुणाची हत्या करणारे दोघे अटकेत

मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी किरकोळ वादातून दोघांनी इम्रान शेख (२२) याची चाकूने भोसकून हत्या केली.

मुंबई : तरुणाची हत्या करणारे दोघे अटकेत
( संग्रहित छायचित्र )

मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी किरकोळ वादातून दोघांनी इम्रान शेख (२२) याची चाकूने भोसकून हत्या केली. मानखुर्द पोलिसांनी अवघ्या १० तासांमध्ये दोन्ही आरोपीना अटक केली.मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यालगत एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तपासात हा तरुण ट्रॉम्बे परिसरातील असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी

आज्ञात तरुणांनी चाकूने वार करून त्याची हत्या केली होती. पोलिसांनी परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाची तपासणी केली. तसेच खबऱ्यामार्फत माहिती मिळविली आणि एका आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने साथीदाराची माहिती पोलिसांना दिली. दुसरा आरोपीला घाटकोपर पोलिसांनी पकडल्याचे चौकशीत उघड झाले. मानखुर्द पोलिसांनी त्यालाही अटक केली. फरहान खान (२२) आणि मसळुद्दीन शेख (१८) अशी या आरोपींची नावे असून किरकोळ वादातून इम्रानची हत्या केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या