मुंबई : मुंबई विद्यापीठात पदवी स्तरावर वाणिज्य शाखेत (बी. कॉम) सर्वाधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ उन्हाळी सत्रातील सहाव्या सत्र परीक्षेचा निकाल हा नुकताच जाहीर झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून…”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले…

ही परीक्षा ६० हजार २८५ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी १५ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण, तर २४ हजार ७०१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ही ३८.३२ टक्के आहे. या परीक्षेस ३ हजार ६९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले असून, २८५ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले. आतापर्यंत विविध ५३ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university bcom session 6 result 38 32 percent mumbai print news ssb
First published on: 07-06-2023 at 20:47 IST