मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे गुरुवारपासून भरविण्यात आलेल्या ‘फीन्स, फिदर्स, पॉज’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनात वाघाची प्रतिकृती न्याहाळणारी मुलगी. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ७ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७.३० दरम्यान हे प्रदर्शन खुले राहणार आहे. पाणी, हवा आणि जमिनीवर वावरणाऱ्या विविध प्रकारच्या पाळीव आणि वन्य प्राणी जीवनावर आधारलेले हे प्रदर्शन तब्बल पाच वर्षांनी विद्यापीठात भरविण्यात येत आहे. ताज्या पाण्यातील मासे, समुद्रातले मासे, पाळीव पक्षी, साप, कुत्रे, मांजरी यांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे.