मुंबई : बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेने ४ जानेवारीपासून प्रत्येक बुधवारी घरोघरी जाऊन ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील ३२ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी सहा हजारांहून अधिक नागरिकांना उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळली आहेत.

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची रक्तदाबाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ४ जानेवारीपासून प्रत्येक बुधवारी आशा सेविका किंवा आरोग्य सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. या सर्वेक्षणात आतापर्यंत २१ हजार ४८२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यापैकी ३० वर्षांवरील ३२ हजार ४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी चार हजार ४३६ नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले. तर उच्च रक्तदाबाचे दोन हजार २४७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

Aapla Dawakhana will provide health care at polling stations
मुंबई : मतदान केंद्रांवर ‘आपला दवाखाना’ आरोग्य सेवा पुरवणार
heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी

हेही वाचा >>> भांडुपमध्ये पाणीपुरवठा बंद

उच्च रक्तदाब असलेल्या चार हजार ४३६ नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात औषधे देण्यात आली. तसेच पुढील उपचारासाठी रुग्णालयास भेट देण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लक्षणे आढळलेल्या रुग्णांची किमान तीन वेळा तपासणी करून त्यांचे अचूक निदान करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

रुग्णालयातील तपासणीत आढळले २१ हजार रुग्ण

मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचीही मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी करण्यात येत असून २ ऑगस्टपासून रुग्णालयांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. २ ऑगस्ट २०२२ ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ८० हजार ८०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून या तपासणीमध्ये नऊ हजार ३५१ जणांना उच्च रक्तदाब, तर नऊ हजार २८ जणांना मधुमेह असल्याचे आढळून आले. तसेच तीन हजार ५१८ जणांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असा दोन्ही त्रास असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.