मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा शुक्रवारपासून पुन्हा सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना जपून भाषा वापरावी, असा सबुरीचा सल्ला भाजप नेतृत्वाने दिला असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यामुळे अटक झाल्यानंतर राणे यांना महाड न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयातही हे प्रकरण प्रलंबित आहे. राणे यांनी जनआशिर्वाद यात्रा पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांना अटकाव करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यत आठवडाभर जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.