मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या प्राकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. पोटदुखीच्या त्रासामुळे शुक्रवारी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुल्र्यातील जमीन बळकावल्याप्रकरणी त्यांना ३ मार्चपर्यंत सक्तवसुली संचलनालय (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ईडीने त्यांना बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात नेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारीला सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते0. नवाब मलिक यांची प्रकृती खाल्यावल्यामुळे त्यांना दुपारी २.३०च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik again in the ed office zws
First published on: 01-03-2022 at 00:58 IST