माझगाव येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना भाजपा नेते मोहित भारतीय यांच्या बदनामीच्या तक्रारीत जामीन मंजूर केला. मलिक यांना न्यायालयात हजर राहून जामीन मागण्याची ही दुसरी वेळ आहे. भारतीय यांनी त्यांच्या तक्रारीत असा आरोप केलाय, की मलिक यांनी त्यांच्या कथित दाव्यांना खरे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याशिवाय युक्तिवाद करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये मलिक कोर्टात हजर झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलिक यांच्यावर असा आरोप होता की, नोव्हेंबरमध्ये जेव्हा त्यांनी कोर्टात जामीन मागितला होता, त्यावेळी  कोर्टातून बाहेर पडताच त्यांनी भारतीय यांच्यावर पुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, माझगाव, मुंबई येथील महानगर दंडाधिकारी, पीआय मोकाशी यांनी १४ डिसेंबर २०२१ रोजी मलिक यांना नोटीस बजावली होती. मलिक यांच्याकडून सार्वजनिक स्तरावर भारतीयांविरुद्ध बदनामीकारक विधाने केली गेली आहेत, असं त्यात म्हटलं होतं. मोहित भारतीय यांच्यातर्फे वकील फैज मर्चंट यांनी न्यायालयाला सांगितले की, मलिकांना जामीन मिळाल्यानंतरही नोव्हेंबरमध्ये त्यांनी मोहित भारतीय यांची बदनामी केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik got bail in second defamation complaint by bjp leader mohit bharatiya hrc
First published on: 13-01-2022 at 10:36 IST