राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या सरकारमधील १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला क्लीनचीट दिली. ‘तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ’, हे मुख्यमंत्र्यांचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली.

इंदापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. आज राज्य सरकारची कार्यपद्धती पाहता हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार असे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री प्रत्येक भ्रष्टाचारी मंत्र्याला क्लीन चीट देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘तुम खाते जावो, मै बचाते जाता हूँ’ हे सरकारचे एकमेव धोरण असल्याचा टोला त्यांनी लगावला.

गांधी विचारांना संपवण्याचा सरकारचा डाव, धनंजय मुंडेंचा आरोप

यापूर्वीही मुंडे यांनी मुंडे गांधी जयंतीदिनी ग्रामसभा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले होते. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला. त्या गांधीजींच्या जयंतीदिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली, असा सवाल उपस्थित करत गांधी विचारांना संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला होता. राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला त्या गांधीजींच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव आहे. सरकारचा जाहीर निषेध, असे त्यांनी म्हटले होते.