महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मारावबाबा आत्राम, संजय बनसोडे, दिलीप वळसे-पाटील यांनी शपथ घेतली आहे.
हेही वाचा : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी…”
यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, तो ऑपरेशन लोटसचा भाग होता. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही.”
हेही वाचा : राष्ट्रवादीत अजित पवारांची बंडखोरी, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले….
“शपथ घेतली, तो त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी करणार,” असे महेश तपासे यांनी सांगितलं आहे.