अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी विविध विद्यापीठांमधील शिक्षक संघटनांनी कुलगुरू राजन वेळुकर आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांना पत्र लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षण संघटनेने डॉ. हातेकर यांच्या बेकायदा व अनैतिक निलंबनाला विरोध दर्शविला आहे. संघटनेतर्फे या संदर्भात राज्यपालांना पत्र लिहून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.या शिवाय मुंबई विद्यापीठातील ४८ शिक्षकांनी हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. हातेकर यांच्या निलंबनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हातेकर यांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2014 रोजी प्रकाशित
डॉ.हातेकरांना अन्य विद्यापीठांतूनही पाठिंबा
अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी विविध विद्यापीठांमधील शिक्षक संघटनांनी कुलगुरू राजन वेळुकर आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांना पत्र लिहिले आहे.
First published on: 16-01-2014 at 03:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeraj hatekar get support from other university