नितीन गडकरी यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उचललेल्या नोटाबंदी तसेच वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) पावलांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे व काळ्या पैशाला चाप लागला आहे. त्यामुळे ज्या लोकांचे काळ्या पैशाचे व्यवहार होते ते लोक आणि त्यांना पाठिंबा देणारे राजकारणी दु:खी झाले असले तरी हे निर्णय देशहिताचे असल्याने सर्वसामान्य लोक मात्र त्यावर खूश असल्याचा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केला.

नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे आज ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार, भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर उपस्थित होते.

नितीन गडकरी यांनी सांगितले की, नोटबंदीच्या निर्णयामुळे तिजोरम्य़ात दडविलेला पैसा लोकांना बँकांमध्ये भरावा लागला. एकूण नोटांपैकी ९९ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्यामुळे सरकारला काळा पैसा बाळगलेल्यांची माहिती शोधणे सोपे झाले आहे. १७ लाख ७३ हजार अशी बँक खाती सापडली आहेत ज्यांच्यामध्ये भरलेले पैसे हे त्यांच्या मालकांच्या आयकराच्या माहितीशी विसंगत आहेत. बँका व वित्तीय संस्थांनी ४.७ लाख खाती संशयास्पद असल्याचे कळविले आहे. या सर्व खात्यांची तपासणी चालू आहे. काळा पैसा शोधून काढणे,त्यावर कारवाई करणे आणि देशाची अर्थव्यवस्था स्वच्छ करम्ण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हजारो बनावट कंपन्या सापडल्या असून त्यांच्या बँक व्यवहारांचाही शोध लागला आहे.

नोटाबंदीमुळे कर भरण्याकडे कल -मुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर :नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. या निर्णयामुळे देश अनौपचारिक अर्थवस्थेकडून औपचारिक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत असून कर न बुडवणारा समाज निर्माण होऊ लागला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. मुख्यमंत्र्यांनी निश्चलीकरणाच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त रामगिरीवर पत्रकारांशी संवाद साधला. कोटय़वधी रुपये अर्थव्यवस्थेचा बाहेर होते.नोटाबंदीमुळे हा सर्व पैसा अर्थव्यवस्थेचा भाग बनला आहे. म्हणजेच हे कोटय़वधी रुपये औपचारिक व्यवस्थेत आले आहेत.  गेल्या वर्षांत ५६ लाख करदात्यांमध्ये वाढ झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.