लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : जोगेश्वरीमध्ये असलेल्या प्रसिद्ध गुंफेचे सुशोभिकरण गेल्या सुमारे १५ वर्षांपासून रखडले आहे. त्याचबरोबर या गुंफेच्या आजूबाजूला १०० मीटर परिसरात बांधकाम करण्यास मनाई असल्यामुळे प्रकल्पबाधित झालेल्या रहिवाशांचा पुनर्विकास प्रकल्पही रखडला आहे. जोगेश्वरी गुंफेचा विषय प्रलंबित असल्यामुळे या परिसरातील सुमारे शेकडो कुटुंबे पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.

Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
heatwave in mumbai and thane mumbai
मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट
Bridge in sea to connect Bandra Worli Sea Bridge and Sea Coast Road
वांद्रे वरळी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाला जोडण्यासाठी समुद्रात पूल
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला

जोगेश्वरी गुंफा ही प्राचीन गुंफा असून केंद्र सरकारच्या अंतर्गत पुरातत्व खात्याच्याअखत्यारित येते. या गुंफेच्या आजूबाजू्च्या परिसराचे पुरातन वास्तू म्हणून जतन करावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही गेल्या १५ वर्षांपासून या गुंफेचे सुशोभिकरण रखडले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला या गुंफेच्या परीसरात असलेल्या पात्र कुटुंबांचे पुनर्वसनही रखडलेले आहे. तसेच या गुंफेच्या परिसरात असलेल्या इमारती, चाळी यांचा पुनर्विकासही रखडला आहे. तर बांधलेली इमारतही अनधिकृत ठरली आहे.

आणखी वाचा-भारतीय रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण! १६ एप्रिल १८५३ रोजी धावली बोरीबंदर ते ठाणे लोकल

जोगेश्वरी येथील गुंफेत इसवी सनापुर्वी ५२० ते ५५० या काळातील बौध्द लेणी आहे. त्यात नंतर हिंदू धर्माचे शिल्पही साकारण्यात आले आहे. मात्र, मुंबईचा पुरातत्व वारसा असलेली लेणी आजही अतिक्रमणात गुरफटली आहे. सन २००७ मध्ये या लेण्याच्या परीसरातील अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यातील लेणीला लागून असलेल्या ६० झोपड्यांचे पुनर्वसन जोगेश्वरी परीसरातच करण्यात आले होते. या गुफेच्या २५ मिटर परीसरात उद्यान तयार करण्यासाठी ही जमीन ताब्यात घ्यावी अशी मागणी माजी नगरसेवक आणि सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी केली होती. मात्र या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात अद्याप यश आलेले नाही.

गुंफेच्या आवारात तब्बल ५२२ घरे गेल्या काही वर्षात उभी राहिली होती. या घरांचे सर्वेक्षण करून त्यातील पात्र घरांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेने केला होता. मात्र पुढे हे काम रखडले होते. त्यापैकी काही पात्र घरांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे अशी सुमारे १११ कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती नर यांनी दिली. गुफेच्या आजूबाजूची जागा उद्यानासाठी आरक्षित असून गुंफेच्या परिसरात उद्यान विकसित करण्याचा निर्णयही सुधार समितीत २००९ मध्ये घेण्यात आला होता. मात्र पुनर्वसनही रखडले असून उद्यानही होऊ शकलेले नाही, जमिनीचे भूसंपादनही झालेले नाही तसेच गुंफेचे सुशोभिकरणही झालेले नाही.

आणखी वाचा-वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?

गुंफे च्या परिसरात असलेल्या चाळी आणि वसाहतीमुळे गुंफेचे नुकसान झाले आहे. गुंफेच्या परीसराला कचरा भूमीचे स्वरुप आले होते. गुंफेची जशी दुर्दशा झाली आहे. तसेच या परिसरातील वसाहतींचेही नुकसान झाले आहे. या परिसरात जयंत चाळ नावाच्या वसाहतीचा पुनर्विकास रखडला आहे. चाळीतील घरे तोडण्यात आली आहेत पण गुंफेच्या परिसरात बांधकाम करता येत नसल्यामुळे १८ कुटुंबे बेघर झाली आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना भाडेही मिळू शकलेले नाही तर घरही मिळालेले नाही. याच परिसरात आणखी एक इमारत उभी राहिली असून गुंफेच्या १०० मीटर परिसरात बांधकाम करू नये असे आदेश असल्यामुळे या इमारतीला अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. या इमारतीला महापालिकेने परवानगी दिलेली असल्यामुळे या इमारतीतील रहिवासीही कात्रीत सापडले आहेत.