विमा कंपन्यांना अजित पवार यांचा इशारा 

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विमा कं पन्यांवर प्रसंगी पोलिसांत गुन्हे दाखल के ले जातील, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राज्य सरकार विमा हप्त्यापोटी हजारो कोटी रुपये खर्च करीत आहे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजेत, विमा कं पन्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात माध्यमांशी बोलताना, अजित पवार यांनी विमा कं पन्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. नांदेड जिल्ह्यात विमा कं पन्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे अर्ज शेतात फे कू न दिल्याच्या तक्रारीकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला.

राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे सगळे उघडपणे दिसते आहे, त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे पवार म्हणाले.

आम्ही  चुकीचे काही करा, असे सांगत नाही, परंतु पिकांच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालीच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असे त्यांनी

सांगितले.