स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले. कांदिवलीच्या पोयसर येथील चाळीत मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. कांदिवलीच्या पोयसर भागात कमलेश प्रसाद नावाची एकमजली चाळ आहे. सकाळी पावणेसातच्या सुमारास झा यांच्या स्वयंपाकघरातील दोन सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात कृष्णकांत झा (४५) यांचा मृत्यू झाला तर अन्य दहा जण जखमी झाले.
त्यांच्यावर कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील सामानाचे नुकसान झाले. नेमका स्फोट कशामुळे झाला, त्याचा समता नगर पोलीस तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2015 रोजी प्रकाशित
सिलेंडर स्फोटात एकाचा मृत्यू
स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले.
First published on: 02-09-2015 at 02:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One death in cylinder blast