नवी मुंबईत सरावादरम्यान एका बालगोविंदाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच मुंबईतील जोगेश्वरी परिसरात सराव करताना हृषिकेश पाटील (१९) या गोविंदाचा मृत्यू झाला. दहिहंडी उत्सवापूर्वीच यंदा दोन गोविदांचा बळी गेल्याने गोविंदांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
जोगेश्वरी पश्चिम येथील बेहरामबाग परिसरातील गणेशनगरमधील ‘ओम साई गोविंदा पथका’चा सराव सुरू होता. हा सराव संपल्यावर आपल्या मित्रांशी गप्पा मारत असताना रात्री अचानक तो जमिनीवर पडला. यानंतर त्याला कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, यंदा १२ वर्षांखालील मुले दहिहंडी उत्सवात सहभागी झाली तर सहभागी करून घेणाऱ्या मंडळावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी रविवारी एका कार्यक्रमात सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
आणखी एका गोविंदाचा मृत्यू
नवी मुंबईत सरावादरम्यान एका बालगोविंदाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच मुंबईतील जोगेश्वरी परिसरात सराव करताना हृषिकेश पाटील (१९) या गोविंदाचा मृत्यू झाला.
First published on: 11-08-2014 at 03:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more govinda dies in mumbai